हरित हायड्रोजन परिसंस्थेचा विकास

1.  "महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023
  • राज्यात हरित हायड्रोजन उत्पादनांस प्रोत्साहन देणे आणि हरित हायड्रोजन परिसंस्था विकसित करणे, या उद्देशाने "महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण - 2023" महाऊर्जाद्वारे तयार करण्यात आले, तसेच महाराष्ट्र शासनातर्फे दि. 17 ऑक्टोंबर 2023 रोजी सदर धोरण जाहीर करण्यात आले आहे.
  • “महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण 2023” च्या सुरळीत अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाने कार्यपध्दती भाग- 01 दि. 13 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित केली आहे.
  • महाऊर्जा कार्यालयाने हरित हायड्रोजन उत्पादकांसोबत आजमितीस एकूण 1010 किलो टन प्रतिवर्ष इतक्या हरित हायड्रोजन उत्पादनासाठी सामंजस्य करार केला आहे.
  • महाराष्ट्र सरकारने 30.09.2024  रोजी “महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरण- 2023” मध्ये 10-15 केटीपीए क्षमतेचे प्रायोगिक अँकर युनिट्स सादर करणारे शुद्धीपत्रक प्रकाशित केले आहे.

2.  हरित हायड्रोजन आणि त्याची मूल्य साखळी करिता ज्ञान भागीदारी कार्यक्रम (Knowledge Partnership Program)

  • महाऊर्जा आणि संबंधित महाराष्ट्र शासनाच्या विभागांच्या अधिकाऱ्यांसाठी महाऊर्जेने इम्पीरियल कॉलेज लंडनसोबत “एक्झिक्युटिव्ह मास्टरक्लास – हरित हायड्रोजन आणि त्याची मूल्य साखळी” करिता ज्ञान भागीदारी कार्यक्रम पूर्ण केला आहे. सदर कार्यक्रम फॉरेन कॉमनवेल्थ डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (FCDO) , ब्रिटीश हाय कमिशन (BHC) यू. के. सरकार यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्यात राबविणेत आला आहे.

 

3.  हरित हायड्रोजन क्लस्टर विकासावर पूर्व व्यवहार्यता अभ्यास
  • महाऊर्जाने ब्रिटिश हाय कमिशनच्या सहकार्याने राज्यात हरित हायड्रोजन क्लस्टर्सच्या विकासासाठी पूर्व व्यवहार्यता अहवाल तयार करण्यात आला आहे.

 

4. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) या विभागांच्या अधिकाऱ्यांची ग्रीन हायड्रोजनमध्ये काम करणाऱ्या संस्थांना अभ्यास भेट.

मा. श्रीमती आभा शुक्ला (भाप्रसे), अतिरिक्त मुख्य सचिव, ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. कादंबरी बलकवडे महासंचालक महाऊर्जा आणि श्री.नारायण कराड, सहसचिव, ऊर्जा विभाग तसेच ऊर्जा विभागाचे अन्य अधिकारी यांच्यासह डॉ. त्रिगुण कुलकर्णी अतिरिक्त महासंचालक (महाऊर्जा),  व महाऊर्जाचे अन्य अधिकारी यांचा अभ्यासदौरा महाऊर्जाच्या हरित हायड्रोजन कक्षातर्फे आयोजित करणेत आला. वरिल अधिकाऱ्यांनी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) व ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया (ARAI)  ची भेट 11 फेब्रुवारी 2025 रोजी करणेत आली. NCL संस्थेतर्फे हरित हायड्रोजन क्षेत्रात करण्यात येणाऱ्या संशोधन व‍ विकास या संदर्भात तांत्रिक सादरीकरणे दिली. तसेच ARAI संस्थेतर्फे  संस्थेमध्ये आजपर्यंत ऑटोमोबाईल क्षेत्रातमध्ये केलेल्या कार्या विषयी माहिती दिली. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून हरित हायड्रोजन फ्युअल सेल, हरित हायड्रोजनशी निगडित उपक्रम व मानके यांसारख्या तांत्रिक विषयांवर सादरीकरण करण्यात आले. नंतर दि. 12 फेब्रुवारी, 2025 रोजी मे.  हायजेनकोच्या हरित हायड्रोजन उत्पादन प्रकल्पास भेट दिली. संस्थेतर्फे संस्थेमार्फंत आगामी काळात आस्थापित होणारे हरित हायड्रोजन प्रकल्प तसेच महाराष्ट्र हरित हायड्रोजन धोरणाचा आढावा यांवर तांत्रिक सादरीकरण केले आणि दि. 14 फेब्रुवारी, 2025 रोजी इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई (IITB) येथे भेट दिली. संस्थेतर्फे हरित हायड्रोजन क्षेत्रात संशोधन व विकास (R&D) हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर  संस्थेच्या प्राध्यापकांकडून विविध प्रात्यक्षिक / विकास कामाच्या प्रकल्पाचे तांत्रिक सादरीकरण झाले. वरील भेटीअंती ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन व सदर संस्था यांचेमध्ये हरित हायड्रोजन क्षेत्रामध्ये परस्पर सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली .