शहरी, औद्योगिक घनकचऱ्यावर आधारित वीज निर्मिती प्रकल्प

घरगुती आणि व्यावसायिक उपक्रमांतून होणारा कचरा दिवसेंदिवस वाढत आहे. औद्योगिक क्रांतीनंतरच्या युगात जलद शहरीकरण आणि औद्योगिकीकरण झाले ज्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती होत आहे. शहरी घनकचरा (MSW) हे ऊर्जा-समृद्ध साहित्य जसे की कागद, प्लास्टिक, अंगणातील कचरा आणि लाकडापासून बनवलेल्या उत्पादनांचे मिश्रण आहे. अलीकडील नवीन तंत्रज्ञानाने हे सिद्ध केले आहे की कचऱ्यापासून ऊर्जा प्रकल्प पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीसाठी कचऱ्याचा वापर करणे शक्य आहे. कचरा-ते-ऊर्जा संयंत्रे शहरी घनकचरा (MSW) जाळतात, बॉयलरमध्ये वाफ तयार करण्यासाठी, आणि वाफेचा वापर इलेक्ट्रिक जनरेटर टर्बाइनला उर्जा देण्यासाठी केला जातो.

 

औद्योगिक कचरा आणि शहरी घनकचऱ्या पासून 5,690 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची भारताची क्षमता आहे. राज्यात शहरी  घनकचऱ्यापासून/औद्योगिक कचऱ्या पासून 898 मेगावॅट वीज निर्मितीस वाव आहे. महाराष्ट्र राज्यात आजपर्यंत एकूण 41.788 मेगावॅट क्षमतेचे (ऑफग्रीड-33.063 मेगावॅट आणि ग्रिड-8.725 मेगावॅट) प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत.

MNRE भारत सरकारने दि. 02 नोव्हेंबर, 2023 रोजी शहरी, औद्योगिक आणि कृषी कचरा/अवशेषांपासून वीज निर्मितीचे धोरण ऊर्जा पुनर्प्राप्तीबाबत धोरण जाहीर केले आहे.

सोलापूर मनपा हद्दीत कचऱ्यावर प्रक्रीया करुन पारेषण संलग्न 3 मे.वॅ. क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प व पिंपरी चिंचवड मनपा हद्दीतील 14 मे.वॅ. क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. 

राज्यातील शहरी/औद्योगिक घनकचऱ्यावर आधारित वीज  निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यशासनाकडून दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे धोरण 2020 जाहिर करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पांची नोंदणी सोप्या व जलद गतीने होण्यासाठी महाऊर्जाने “Single Window Portal” दि. 15 डिसेंबर, 2022 रोजी जाहिर केले आहे. अपाऊ धोरण -2020 अंतर्गत सद्यस्थितीत 14 मे.वॅ. क्षमतेच्या 01 शहरी/औद्योगिक घनकचऱ्यावर आधारित वीज  निर्मिती प्रकल्पाला नोंदणी देण्यात आली आहे.

लाभार्थी MNRE-Gol कडून केंद्रीय आर्थिक सहाय्य देखील घेऊ शकतात.( Link: https://biourja.mnre.gov.in/)