बायोमास (कृषी-अवशेष) आधारित वीज निर्मिती प्रकल्प

आढावा -

भारत आपल्या कृषी, कृषी-औद्योगिक आणि वनीकरण कार्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बायोमास सामग्रीचे उत्पादन करतो. बायोमास हे नैसर्गिक उर्जा स्त्रोतांपैकी एक आहे. बायोमास हे इंधन आहे जे सेंद्रिय पदार्थांपासून विकसित केले जाते, ते ऊर्जा निर्मितीसाठी वापरण्यात येणारा अक्षय आणि शाश्वत स्त्रोत आहे. शेतीचे अवशेष, वनीकरणाचे अवशेष आणि लाकूड हे बायोमासचे मुख्य स्त्रोत आहेत. बायोमास एकतर थेट वापरला जाऊ शकतो किंवा जैवइंधनासारख्या उर्जेच्या इतर स्वरूपात रूपांतरित केला जाऊ शकतो.

about

बायोमासचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

प्रकल्पामध्ये वापरल्या जाणार्‍या बायोमासचे प्रकार सामान्यत: जळण्याच्या उद्देशाने वापरले जातात उदा: ग्रामीण भागात घरगुती वापरासाठी पाणी गरम करणे, स्वयंपाक करणे. नारळाचे शेंडे, तागाच्या काड्या, मक्याचे देठ, भुईमूग पेंढा/कवच, तूर देठ, मिरचीचे देठ, तांदळाचा भुसा, धानकोंडा ज्युलिफ्लोरा इ.

नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय (MNRE), भारत सरकार यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात बायोमास पासून एकूण 2629.55 मेगावॅट क्षमतेच्या निर्मितीस वाव आहे.

 

बायोमास आधारित वीज निर्मितीसाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान:

या बायोमास सामग्रीपासून वीज निर्मितीचे तंत्रज्ञान पारंपरिक कोळशावर आधारित औष्णिक वीजनिर्मितीसारखेच आहे. वाफ निर्माण करण्यासाठी बायोमास बॉयलरमध्ये जाळले जाते, जे वीज निर्मितीसाठी टर्बाइन ला पाठविले जाते.

असे प्रकल्प राज्यात आस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय नवी दिल्ली यांनी बायोमास कार्यक्रम जाहीर केला असून त्या अंतर्गत विकासक आर्थिक सहाय्य देखील प्राप्त करू शकतात .  .(Link: https://biourja.mnre.gov.in/ )

डाउनलोड करा -