संकेतस्थळ धोरणे

खाजगी धोरण

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संकेतस्थळ तुमच्याकडून कोणतीही विशिष्ट वैयक्तिक माहिती आपोआप कैद करत नाही, (जसे की नाव, फोन नंबर किंवा ई-मेल पत्ता), ज्यामुळे आम्हाला तुमची वैयक्तिकरित्या ओळख पटते. जर महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संकेतस्थळाने तुम्हाला वैयक्तिक माहिती देण्याची विनंती केली तर, ज्या विशिष्ट हेतूंसाठी ही माहिती गोळा केली जाते त्या हेतूंसाठी तुम्हाला सूचित केले जाईल आणि तुमच्या वैयक्तिक माहितीचे संरक्षण करण्यासाठी पुरेशा सुरक्षा उपाययोजना केल्या जातील. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण संकेतस्थळावर स्वईच्छेणे वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहिती कोणत्याही थर्ड पार्टीला (सार्वजनिक/खाजगी) विकत नाही किंवा वाटप करत नाही. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाला प्रदान केलेली कोणतीही माहिती नुकसान, गैरवापर, नामंजूर प्रवेश किंवा उघडकीस आणणे, फेरफार किंवा हानी यापासून संरक्षित केली जाईल. आम्ही यूजरबद्दल काही माहिती गोळा करतो, जसे की इंटरनेट प्रोटोकॉल (IP) अॅड्रेस, डोमेन नाव, ब्राउझर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ. महाऊर्जाच्या संकेतस्थळाला भेट देणार्‍या व्यक्तींच्या पत्त्यांचा पाठपुरावा करण्याचा कोणताही प्रयत्न करत नाही जोपर्यंत संकेतस्थळाचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला जात नाही तोपर्यंत.

हायपरलिंक धोरण

बाह्य संकेतस्थळ /पोर्टलसाठी हायपर लिंकिंग पॉलिसी लिंक्स:

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेतस्थळे/ पोर्टल्स यांच्या लिंक्स दिसतील. या लिंक्स तुमच्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. संकेतस्थळावर लिंक केलेल्या मजकुरासाठी आणि खात्रीसाठी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण जबाबदार नाही. त्यात व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे आम्ही समर्थन करत नाही. लिंकची केवळ उपस्थिती किंवा संकेतस्थळावर त्याची सूची हे कोणत्याही प्रकारची मान्यता म्हणून गृहीत धरू नये. आम्ही हमी देऊ शकत नाही की ह्या लिंक्स नेहमी कार्य करतील आणि लिंक केलेल्या पृष्ठांच्या उपलब्धतेवर आमचे कोणतेही नियंत्रण नाही.

इतर संकेतस्थळांद्वारे महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्थेच्या संकेतस्थळाच्या लिंक्स:

अन्य संकेतस्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळाची लिंक तुम्ही महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण या संकेतस्थळावरील माहितीची लिंक देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही. तथापि, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाला दिलेल्या कोणत्याही लिंक्सबद्दल तुम्ही आम्हाला कळवावे जेणेकरुन तुम्हाला त्यातील कोणत्याही बदलांची किंवा अद्यावत केलेली माहिती मिळू शकेल. तसेच महाऊर्जाच्या संकेतस्थळाचे पेज तुमच्या साइटवर फ्रेममध्ये लोड करण्याची परवानगी देत नाही. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या संकेतस्थळाच्या पेजवर यूजरने नवीन उघडलेल्या ब्राउझर विंडोमध्ये लोड करणे आवश्यक आहे. पोर्टलशी लिंक करण्यासाठी अधिक तपशील आणि बॅनरसाठी महाऊर्जा विभागाला भेट द्या.