वापरसुलभता

कोणत्याही उपकरणांचा, तंत्रज्ञानाचा किंवा क्षमतेचा वापर करून, सर्व प्रकारच्या वापरकर्त्यांना महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) हे संकेतस्थळ बघता आणि वापरता यावे, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. संकेतस्थळला भेट देणाऱ्या व्यक्तीला जास्तीत जास्त उपयोगता व सुलभता व्हावी या उद्देशाने हे संकेतस्थळ तयार करण्यात आले आहे. परिणामी, हे संकेतस्थळ वेब-सक्रीय मोबाईल उपकरणे, वॅप फोन, पी. डि. ए इत्यादी विविध उपकरणांवरून पाहिले जाऊ शकते.

दिव्यांग व्यक्तींनाही या संकेतस्थळावरील माहितीचा लाभ घेता यावा, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत. उदा. स्क्रीन रीडर आणि भिंग अशा सहाय्यक पर्यायांचा वापर करून दृष्टीहीन व्यक्तींनाही या संकेतस्थळावरील माहितीचा लाभ घेता येईल.

या संकेतस्थळाला भेट देणाऱ्यांना सोईस्कर वाटेल, अशा प्रकारे या संकेतस्थळाचे विकसन करत असतानाच मानकांचे पालन करणे तसेच वापर सुलभता आणि रचनेसंबंधीच्या सर्वसामान्य तत्त्वांचे पालन करणे, हे सुद्धा आमचे ध्येय आहे. या संकेतस्थळाच्या वापर-सुलभतेसंदर्भात तुमच्या काही सूचना असतील किंवा काही समस्या असतील तर कृपया आमच्याशी संपर्क साधा.

सुगमता वैशिष्ट्येः

सुगमतेचे पर्याय

पटलावरील मजकूर वाचणे आपल्याला कठीण वाटते का ?
पटलावर दिसणारी माहिती स्पष्टपणे दिसू शकत नाही का ?
उत्तर "हो" असल्यास उपलब्ध मजकूर वाचता यावा, यासाठी या संकेतस्थळावर पुरवण्यात आलेल्या सुगमता पर्यायांचा वापर करा. पटलावरील मजकूर सहज वाचता यावा आणि माहिती स्पष्टपणे दिसावी, यासाठी मजकुराचा आकार आणि रंगसंगती बदलण्याची सुविधा या पर्यायांद्वारे उपलब्ध आहे.

मजकुराचा आकार बदलणे

मजकुराचा आकार प्रमाणित आकारापेक्षा लहान किंवा मोठा करता येणे शक्य आहे. मजकूर सहजपणे वाचता यावा, यासाठी तीन पर्याय प्रदान करण्यात आले आहेत. त्यांचा वापर करून मजकुराचा आकार वाढवता येईल. हे पर्याय पुढीलप्रमाणे -

विशाल: विशाल आकारामध्ये मजकूर प्रदर्शित करतो.
मोठा: प्रमाणित आकारापेक्षा मोठया आकारात मजकूर प्रदर्शित करतो.
मध्यम: माहिती प्रमाणित आकारात अर्थात मूळ आकारात मजकूर प्रदर्शित करतो.

मजकुराचा आकार बदलण्यासाठी कोणत्याही पृष्ठावर वरील बाजूस उजव्या कोपऱ्यात "मजकूर आकार" या बटणावर क्लिक करा.

पीडीएफ फाइल्स स्क्रीन रीडरद्वारे प्रवेशयोग्य नाहीत. त्यावर आम्ही काम करत आहोत.