ऊसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्प

आढावा -

बगॅस (ऊसाची चिपाडे) हा कोरडा तंतुमय पदार्थ आहे जो ऊसाचे गाळप केल्यानंतर मिळतो.

सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये वाफेच्या निर्मितीसाठी उच्च दाब बॉयलर आणि ऊर्जा निर्माण करण्यासाठी टर्बो जनरेटरचा वापर केला जातो. तसेच उच्च दाब बॉयलरमध्ये बगॅस 490-520°C तापमानामध्ये व 60-80kg/cm2 दाबावर जाळला जातो. तयार झालेली उच्च दाबाची वाफ टर्बाइनमधून जाते आणि जनरेटरद्वारे वीज निर्माण करते. टर्बाइनमधून कमी दाबाची वाफ साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी वापरली जाते.

वाफेचा वीज निर्मिती आणि साखर प्रक्रियेसाठी वापर करण्याच्या या प्रक्रियेला सहवीजनिर्मिती म्हणतात.

तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पामधून तयार झालेली वीज साखर कारखान्यामध्ये इतर प्रक्रियेसाठी वापरली जाते आणि अतिरिक्त वीज ही वीजकंपनीला विक्री /निर्यात केली जाते.

सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्यात एकूण 2690.30 मे.वॅ. क्षमतेचे 153 सहवीज निर्मिती प्रकल्प आस्थापित झाले आहेत.

             राज्यातील ऊसाच्या चिपाडावर आधारित सहवीज निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यशासनाकडून दि. 31 डिसेंबर, 2020 रोजी अपारंपरिक ऊर्जा निर्मितीचे धोरण 2020 जाहिर करण्यात आले आहे. तसेच प्रकल्पांची नोंदणी सोप्या व जलद गतीने होण्यासाठी महाऊर्जाने “Single Window Portal” दि. 15 डिसेंबर, 2022 रोजी जाहिर केले आहे. अपाऊ धोरण -2020 अंतर्गत सद्यस्थितीत 362.1 मे.वॅ. क्षमतेसाठी 21 सहवीज निर्मिती प्रकल्पांना नोंदणी देण्यात आली आहे.

खालीलप्रमाणे सरणीबद्ध स्वरूपात सुरू केलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पांबद्दल तपशील.